भारतीय बिनविषारी साप

बिनविषारी साप

अजगर Indian Rock Python (python molerus molerus)

अजगर हा भारतात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.
पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.
हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर  त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.
जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८ - १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते.
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.
फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.

धामण Rat snake (Ptyas mucosus)

हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस  आहे. सर्व भारतभर तो आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी ,८३० मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर सापडतो.

हा दांडगा आणि भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २·२५ ते २·५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट लांबीच्या एकचतुर्थांश असून टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून  स्पष्टपणे वेगळे असते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळया असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा (कनीनिका) सोनेरी असतो. नाकपुड्या मोठ्या असतात. पाठीचा रंग हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीराच्या पुढील भागावरील खवले एकाच रंगाचे असतात; पण मागच्या बाजूला पुष्कळ खवल्यांच्या कडा काळ्या असतात. यामुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. पाठीवरील काही खवल्यांवर बारीक कणा असतो. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट किंवा पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.

धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत आढळणारा नित्यातला साप आहे. घरांच्या जवळपास तो दिसतो. मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो; पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती, झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. तो उत्तम पोहणारा असून झाडावर चढण्यात तरबेज आहे. पाण्याच्या जवळपास राहून तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे. 

शक्यतोवर माणसाचे सान्निध्य तो टाळतो; पण त्याला कोंडीत पकडले, तर त्वेषाने हल्ला चढवायला तो कमी करीत नाही. हल्ला चढवताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून तो प्रहार करतो व चावतो. पुष्कळ मोठा व भयंकर दिसणारा असला, तरी तो मुळीच विषारी नाही. हा चलाख असून याच्या सगळ्या हालचाली शीघ्र गतीने होत असतात.

या सापासंबंधी बऱ्याच समजुती प्रचलित आहेत : धामण हा नागांचा नर आहे; गायीचे किंवा म्हशीचे आचळ तोंडात धरून तो सगळे दूध चोखून घेतो, नंतर आचळाला दंश करून तिला ठार करतो किंवा आपले शेपूट गायीच्या किंवा म्हशीच्या नाकात खुपसतो आणि नंतर ते जोराने बाहेर काढून तिला मारतो; चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला चावला, तर तो आंधळा होतो इत्यादी. या सगळया समजुती चुकीच्या आहेत.

हा अंडी घालणारा साप असून पिल्ले पावसाळयात अंडी फोडून बाहेर पडतात. धामण ज्या टायास  वंशातली आहे त्याच वंशाच्या पट्टेरी धामण (टायास फॅसिओलेटस) व वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती भारतात आढळतात.

तस्कर Common Trinket Snake (Elaphe helena)

तस्कर जम्मू काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारत सोडून संपूर्ण भारतात सापडतो. (शास्त्रीय नावःElaphe helena) हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. 

 हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत. छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी हा साप खातो.

गवत्या (Green Keel back )

गवत्याया नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो.

गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा
(
उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.

बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात.

गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात.

वाळा (Ramphotyphlops braminus)

वाळा हा भारतात  सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो.

वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२. सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.

महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.

वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.

वाळा मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या खातो.

वाळ्यांमध्ये अंड्यांद्वारे प्रजनन होते. सर्वसाधारणतः - तांदळाच्या आकाराची अंडी घातली जातात.

हरणटोळ (Green Vine Snake)

हरणटोळ हा भारतात जंगलांमध्ये सापडतो. हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो,

हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो, त्यची जीभ हि लांब आणि गडद हिरव्या रंगाची असते जीने तो आजूबाजूच्या स्तिथी चा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.

एका वयस्क हरणटोळ चा घेर २ सेमी असून लांबी २ मीटर पर्यंत वाधू शकते. तो आपल्या लांब शेपटी चा वापर झाडावर चडताना किव्वा शिकार करताना माकडा सारख्या फांद्यांना पकडायला वापरतो. दुसऱ्या सापांपेक्षा याचे डोके लांब असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.

हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला वाचवण्यासाठी पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगाच्या झाडांमध्ये गायब होण्याच्या सवयीवर अवलंबून असतो. हरणटोळ हा पाली. सरडे. बेडूक आणि इतर कुर्ताडणाऱ्या प्राण्यांना खातो. तो आपल्या भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळून खातो.

हरणटोळ हा माध्यम विषारी साप आहे, जरी त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो तर मोठ्यांना माधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही आहे.

आजकाल हरणटोळ हा अनेक ठिकाणी पेट म्हणून ठेवण्यात येत आहे, जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते. बाजारात सुद्धा त्यची विक्री होण वाढलेलं आहे, त्वचेच्या रंगामुळे लोकांच्या पसंतीस आल्यामुळे घरात पाळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र सापाच्या जंगलातील संख्येवर आणि बंदिस्त अवस्थेत त्याच मरण्यात होत आहे.

कुकरी (oligodon arnensis)

या सापांचा कोल्युब्रिडी सर्पकुलात समावेश होतो. यांच्या एकूण ४० जातींपैकी सु. १३ भारतातील आहेत. यांतील काही जाती भारतात सर्वत्र सापडतात आणि बाकीच्या निरनिराळ्या भागांतच दिसून येतात.

हे बिनविषारी साप लहान असून त्यांची लांबी ३० ६० सेंमी. असते. इतर सापांच्या मानाने यांना थोडे दात असतात. वरच्या जबड्यातील मागचे काही दात गुरख्यांच्या कुकरीच्या आकाराचे असल्यामुळे यांनाकुकरीसाप म्हणतात. हे चपळ असून भित्रे नसतात. सरडे, पाली व त्यांची अंडी यांवर ते उदरनिर्वाह करतात.

भारतात सगळीकडे आढळणारी सामान्य जात ऑलिगोडॉन आर्नेन्सिस  ही आहे. ही महाराष्ट्रात पुष्कळ सापडते. शरीर तपकिरी असून त्यावर २०६० काळे आडवे पट्टे असतात; त्यांपैकी ६१२ शेपटीवर असतात. पोट पांढरे असते. डोक्यावर ^ च्या (उलट्या रोमन व्ही अक्षराच्या) आकाराच्या लागोपाठ तीन खुणा असतात म्हणून या सापालात्रिशरम्हणतात.

हा नेहमी आढळणारा साप असला तरी पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात असतो पण सु. १, ६७५ मी. उंचीवरही आढळलेला आहे. याला डिवचल्यावर चिडून तो आपले सगळे शरीर खूप फुगवतो. मादी अंडी घालते. ऑलिगोडॉन  वंशातील आणखी एकदोन जाती महाराष्ट्रात आढळतात. 


डुर्क्या घोणस (gonglyophis conicus)

हा एक साप असून त्याला कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.

 डुर्क्या घोणस भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे याला विशेष मानवते. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप आहे असे काहींचे म्हणणे आहे, पण मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही (उदा., पश्चिम घाटात) तो आढळतो.

 याची लांबी ३०-७५ सेंमी. असून शरीर जाड असते; शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले आणि फक्त २५-४० मिमी. लांब असते, त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते; पाठीकवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही नमुन्यांचा रंग काळसर असून पाठीवर करडया रगाचे विषयम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.

 डुर्क्या घोणस विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.

या सापाच्या वर्णनात काही ठिकाणी `हा साप अंडज असून मादी उन्हाळयात अंडी घालते' असे आणि याच्या उलट काही ठिकाणी, `हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात, असेही म्हटलेले आढळते. दुसरे विधान खरे असावे असे दिसते.


कवड्या  Wolf snake (lycodon aulicus)


या बिनविषारी सापाचा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या कोल्युब्रिनी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव लायकोडॉन ऑलिक्स आहे. हा भारतात आणि श्रीलंकेमध्ये सगळीकडे आढळतो; शिवाय अंदमान, मलाया, इंडोचायना आणि फिलिपीन्स बेटांतही तो सापडतो. सपाट प्रदेशांत तो सगळीकडे आढळत असला तरी ६१० मी. पेक्षा जास्त उंचीवर सापडत नाही.

घराभोवतालच्या आवारात किंवा बागेत, खुद्द घरात गुरांच्या गोठ्यात तो पुष्कळदा दृष्टीस पडतो; बाजार वगैरे दाट वस्तीच्या जागीही तो आढळतो. हा साप रात्रिंचर असल्यामुळे दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी - पडीक भिंतीतल्या भेगा, दगड आणि विटा यांचे ढीग, गोठ्यातील चाऱ्याचे ढिगारे, जमिनीतली बिळे इत्यादींमध्ये-लपून बसतो आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. उंदीर, सरडे, पाली इत्यादींवर हा आपली उपजीविका करतो. 


 याची लांबी सु. ६०-७५ सेंमी असते. शरीर सडपातळ आणि किंचित चपटे असून शेपूट निमुळते काहीसे आखूड असते. नमुनेदार कवड्या सापाचा रंग तपकिरी-फिक्कट तपकिरी रंगापासून तो गर्द तपकिरी रंगापर्यंत असतो. क्वचित काळ्या रंगाचा एखादा साप आढळतो. पाठीवर पांढुरक्या किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. मानेभोवती याच रंगाचे वलय असते. आडवे पट्टे डोक्याजवळ सुरू होतात; पुढच्या भागात ते अगदी स्पष्ट असतात, पण मागच्या बाजूकडे क्रमाक्रमाने अस्पष्ट होत जाऊन शेपटीच्या टोकाकडे ते पूर्णपणे नाहीसे होतात. बहुतेक नमुन्यांत पट्ट्यांची संख्या ते १८ असते; कधीकधी ही संख्या यांपेक्षाही कमी असू शकते, पण अजिबात पट्टे नाहीत असे सहसा होत नाही. पोटाचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळसर असतो.

खालच्या वरच्या जबड्यांवरील पुढचे दात बरेच मोठे असतात. वरचा ओठ पांढरा किंवा त्यावर तपकिरी ठिपके असतात; डोळे काळेभोर आणि बाहुली उभी असते.

हा अतिशय चपळ असून झाडांवर इतर उंच ठिकाणी सहज चढून जातो. हा साप माणसाच्या दृष्टीस पडल्यास बहुधा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अडथळा केला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला, तर तो उग्र स्वरूप धारण करून अत्यंत धीटपणे प्रहार करतो कडकडून चावतो. पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नसतो.

या सापाची मादी फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत केव्हातरी अंडी घालते. एका खेपेला घातलेल्या अंड्यांची संख्या ते असते. अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले १५-१८ सेंमी. लांब असून रंग, शरीरावरील पट्टे . बाबतींत हुबेहूब प्रौढांसारखी असतात.


काही लोक या सापाला चुकीने मण्यार समजतात; पण मण्यारीचे पट्टे डोक्याच्या मागे काही अंतरावर सुरू होतात आणि ते शरीराच्या मागच्या भागात ठळक असून शेपटीच्या टोकापर्यंत असतात. शिवाय कवड्या सापाच्या गुदद्वाराचा खवला आणि शेपटीच्या खालचे खवले दुभागलेले असतात, पण मण्यारीत ते सबंध असतात.


नायकुळ Banded Racer (Argyrogena fasciolata)

नायकुळ  किव्वा पट्टेरी धूळनागीण हा बिन विषारी साप आहे. याला इंग्लिश मध्ये Banded Racer असेही म्हणतात याची स्थानिक नावे: नायकुळ (दक्षिण कोकण), धूरनागीण (विधर्भ), गाव्हाल्या (मराठवाडा), नागीण (गोवा), ताडजेरी (गडचिरोली).

सरासरी लांबी- ७५ सेमी. (२ फुट ६ इन्च)

अधिकतम लांबी- १३४ सेमी (४ फुट ५ इंच)

रंग व आकार- फिकट किव्वा गडद तपकिरी, लांब शरीरावर मौ खवले, निमुळते टोकदार डोके, शेपूटही लांब व निमुळती.

प्रजनन- फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मादी ५ अंडी घालते. पिल्लांच्या अंगावर ठराविक अंतरावर पांढरे पत्ते असतात नंतर ते जातात.

आढळ- मध्य व दक्षिण भारत.

खाद्य- मुख्यतः उंदीर.

वास्तव्य- गवतात. झुडूपात उंदरांच्या बिळात किवा दगडांमध्ये.

वैशिष्ट्ये- दिनचर, चपळम डिवचला गेला असता मानेचा भाग फुगवतो. त्यामुळे काहीसा नागासारखा दिसतो. भक्ष्य पकडल्यास गील्ण्यापुर्वी त्याला वेढे घालतो.

This free website was made using Yola.

No HTML skills required. Build your website in minutes.

Go to www.yola.com and sign up today!

Make a free website with Yola